सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचं संस्था सक्षमीकरणाबाबत कणकवलीत शनिवारी चर्चासत्र !

शंभर टक्के पूर्ण कर्ज फेड केलेल्या विकास संस्था पदाधिकाऱ्यांचा ५ नोव्हेंबर रोजी सत्कार
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 29, 2022 21:42 PM
views 148  views

सिंधुदुर्गनगरी : कणकवली तालुक्यातील विकास संस्थांच्या सक्षमीकरणाबाबत सर्व संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संस्था कमिटी सदस्य व सचिव यांचे चर्चासत्र शनिवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १०.३० वा. कणकवली येथील श्री भगवती मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी ३० जून २०२२ अखेर वसूल पात्र बँक कर्जाची १०० टक्के पूर्ण फेड केलेल्या प्राथमिक विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,संस्था कमिटी सदस्य व सचिव यांचा सत्कार करण्यात येणार आहे. 

कार्यक्रमास आमदार नितेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, समीर सावंत, श्रीम.प्रज्ञा ढवण, सुशांत नाईक उपस्थित राहणार आहेत. या चर्चासत्रास व सत्कार सोहळ्यास कणकवली तालुक्यातील सर्व विकास संस्थांचेअध्यक्ष, उपाध्यक्ष, संस्था कमिटी सदस्य व सचिव यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी केले आहे.