व्ही पी कॉलेजमध्ये डी फार्म - बी फार्म कोर्ससाठी मुलींना 100% सवलत

Edited by: विनायक गांवस
Published on: July 11, 2024 13:40 PM
views 223  views

सावंतवाडी : व्ही पी कॉलेज माडखोल येथे डी फार्म,बी फार्म कोर्ससाठी मुलींना शिक्षण शुल्कात 100% सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या ८ जुलै २०२४ च्या निर्णयानुसार खुल्या व इतर मागास वर्गीय प्रवर्गातील पात्र विद्यार्थिनींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100%लाभ देण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाची सवलत व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोल ता. सावंतवाडी या महाविद्यालयात डी.फार्म व बी. फार्म या अभ्यासक्रमासाठी लागू करण्यात आलेली आहे. या शासनाच्या निर्णयाने विद्यार्थिनींना तसेच पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे  सदरील शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाविद्यालयास संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.