
देवगड : मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनाबाबत अंगणवाडी सेविकांची बैठक पंचायत समिती देवगड येथे गटविकास अधिकारी श्रीम .वृक्षाली यादव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी वृक्षाली यादव म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी देवगड तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना १०० % लाभ मिळावा यासाठी सर्व अंगणवाडी सेविकांनी योगदान द्यायचे असुन काही तांत्रिक अडचणी आल्यास संबधीत कार्यालयाशी संपर्क साधून त्या पुर्ण कराव्यात असे आवाहन गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांनी अंगणवाडी सेविकांना केले आहे .
यावेळी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी देवगड समिर होडावडेकर , मुख्यसेविका राखी राणे , मुख्यसेविका पुजा सावंत , मुख्यसेविका सुवर्णा भगत , आरोग्य विस्तार अधिकारी प्रतिमा वळंजु , आरोग्य विस्तार अधिकारी गंगुताई अडुळकर , लेखा सहाय्यक तथा डाटा इंजिनियर शर्विन कांबळी आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत ऑनलाईन अॅपबाबत तसेच ऑफलाईन अर्जाबाबत माहिती देण्यात आली. तसेच योजनेबाबत अटी व शर्तीबाबत विस्तृत माहिती देण्यात आली.