
वैभववाडी : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने छपाई केलेल्या दिनदर्शिकेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले.मनसेच्यवतीने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात या १० हजार दिनदर्शिकांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने दरवर्षी दिनदर्शिकेचे वितरण केले जाते.याही वर्षी कोकणात १० हजार दिनदर्शिका वाटप केले जाणार आहे.या दिनदर्शिकेचे नुकतेच मुंबई शिवतीर्थ येथे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे व मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी मनविसेचे राज्य प्रमुख संघटक .यश सरदेसाई, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क अध्यक्ष अमोल साळुंके, मनविसे दक्षिण रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण, उत्तर सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क अध्यक्षा सिद्धी नारकर, वैभववाडी तालुका संपर्क अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे, देवगड तालुका संपर्क दिनेश झोरे, कुडाळ तालुका संपर्क अध्यक्ष सर्वेश सावंत, दापोली तालुका संपर्क अध्यक्ष अमोल काते, राजापूर तालुका संपर्क अध्यक्ष . दिप्तेश जाधव, रत्नागिरी तालुका संपर्क अध्यक्ष गौरव डोंगरे, मंडणगड तालुका संपर्क अध्यक्ष विनायक हंबीर, सचिन कदम, प्रथमेश हेगिष्टे उपस्थित होते.