दारूसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त | उत्पादन शुल्कची मळेवाड इथं कारवाई

Edited by: विनायक गावस
Published on: November 24, 2023 18:53 PM
views 40  views

सावंतवाडी : गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या बलेनो कारवर गुरूवारी रात्री उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाने मळेवाड येथे कारवाई केली. या कारवाईत २ लाख २४ हजार रुपयांची दारू व ८ लाख किंमतीची बलेनो कार असा एकूण १० लाख २४ हजार किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला तर बेकायदा दारू वाहतूक केल्या प्रकरणी प्रदीप विश्वनाथ निग्रे ( वय. ५८ रा. खारेपाटण ) यास ताब्यात घेतले.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे इन्सुलीचे पथक गोवा बनावटीच्या दारूची होणारी वाहतूक रोखण्यासाठी गस्त घालत होते दरम्यान मळेवाड जंक्शन येथे आरोदाहुन मळेवाडच्या दिशेने जाणारी आलिशान बलेनो कार एमएच 07एजी 1895 आली असता गाडी तपासणी साठी थांबविली गाडीची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीच्या दारूचे तब्बल ४०बॉक्स आढळून आले.  याप्रकरणी चालकाला ताब्यात घेतले.

सदर कारवाई गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास केली. ही कारवाई दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील ,प्रदीप रासकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान दीपक वायदंडे, प्रसाद माळी, रणजित शिंदे, यांनी केली.