
वेंगुर्ले : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भारतमातेच्या गौरवगाथेला साजेसा देशभक्तीचा गजर वेंगुर्ला तालुक्यात घुमला. भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली वेंगुर्ला तालुका मर्यादित भव्य देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा वेंगुर्ला हायस्कूल येथे उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाचे उद्घाटन नामांकित उद्योजिका सीमा नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, मुख्याध्यापक सचिन बिडकर सर , तालुकाध्यक्ष विष्णु परब , सुहास गवंडळकर , साईप्रसाद नाईक , जेष्ठ नागरिक संघाचे एस.एस.काळे , मा.मुख्याध्यापक प्रमोद कांबळे सर , कोकण कला आणि शिक्षण संस्थेचे प्रथमेश सावंत , वसंत तांडेल , नामदेव सरमळकर , किशोर सोनसुरकर सर , सुनिल जाधव सर , आवळे - धुरी मॅडम , संजय परब ,जानकर सर , कर्पुरगार जाधव सर , राजेश घाटवळ सर तसेच माध्यमिक व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
प्राथमिक आणि माध्यमिक गटातील निवडक संघांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांना भारावून टाकले. स्पर्धेचे परीक्षण रुपेंद्र परब आणि अमृता पेडणेकर यांनी अत्यंत काटेकोरपणे केले.
स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे:
🔹 माध्यमिक गट (८ वी ते १० वी)
प्रथम: आसोली हायस्कूल, आसोली
द्वितीय: श्री शिवाजी हायस्कूल, तुळस
तृतीय: अणसूर पाल हायस्कूल, अणसूर
उत्तेजनार्थ प्रथम: श्रीदेवी सातेरी हायस्कूल, वेतोरे
उत्तेजनार्थ द्वितीय: दाभोली इंग्लिश स्कूल, दाभोली
🔸 प्राथमिक गट (५ वी ते ७ वी)
प्रथम: जिल्हा परिषद शाळा, वजराठ क्र. १
द्वितीय: जिल्हा परिषद शाळा, वेंगुर्ले क्र. ४
तृतीय: जिल्हा परिषद शाळा, आडेली क्र. १
उत्तेजनार्थ प्रथम: जिल्हा परिषद शाळा, वेतोरे क्र. १
उत्तेजनार्थ द्वितीय: जिल्हा परिषद शाळा, वेंगुर्ले क्र. १
सर्व विजेत्या संघांना चषक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम प्रदान करण्यात आली. सूर, ताल, शब्द स्पष्टता, अभिव्यक्ती आणि समन्वय या निकषांवर परीक्षकांनी स्पर्धेचे मूल्यमापन केले.
या वेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई म्हणाले, "देशभक्ती ही फक्त गाण्यात नाही, तर कृतीतही दिसली पाहिजे. विद्यार्थ्यांनी गायनातून देशप्रेमाची प्रेरणा घेतली पाहिजे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पुढे यावे."
या उपक्रमाला कोकण कला आणि शिक्षण संस्था यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन डॉ. सचिन परुळकर यांनी केले.