... म्हणून केसरकरांना शिंदेंनी दुर केल : खा. विनायक राऊत

Edited by:
Published on: June 11, 2023 16:52 PM
views 184  views

सावंतवाडी : शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे भविष्यात शिंदे गटात राहणार नाहीत हे समजल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सावंतवाडीतील कार्यक्रमात त्याचा प्रत्यय आला. तर दहशतवादाचे हत्यार पुढे करून ज्या नारायण राणे यांच्या विरोधात केसरकरांनी राजकारण केले त्याच राणेंना पाण्याचे ग्लास उचलून देण्याची पाळी केसरकरांवर आली अशी टिका खासदार विनायक राऊत यांनी  केली. मुख्यमंत्री यांनी दीपक केसरकर यांना वाळीत टाकले आहे. कालच्या सावंतवाडी येथील सभेत दोघांमध्ये झालेल्या संभाषणावरून हे दिसून आले.मुळात केसरकर हे आपल्या सोबत शिंदेगटात राहणार नाही हे त्यांना कळून चुकले आहे अशी टिकाही खा. विनायक राऊत यांनी केली.