
सावंतवाडी : नगरपालिका प्रशासनाने स्थानिक विक्रेत्यांवर केलेली कारवाई अन्यायकारक असून त्याची परतफेड आम्ही व्याजासहीत करणार असा इशारा मनसेचे अँड. राजू कासकर यांनी दिला आहे. वटपौर्णिमेपर्यंत स्थानिक व्यापाऱ्यांना बाहेर बसण्याची मुभा नगरपालिका प्रशासनाने देण्यात यावी अन्यथा येत्या काळात आम्ही नगरपालिकेला मनसे स्टाईलने धडक देऊन विविध प्रश्नांवर जाब विचारू असा रोखठोक इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.