
वैभववाडी: दुचाकीवरून पडून जखमी झालेल्या सोनाळी गावठणवाडी येथील शोभा मारुती गुरव (वय५८)यांच शुक्रवारी (ता.३) उपचारादरम्यान कोल्हापूर येथे निधन झालं.त्यांच्या आकस्मिक मृत्यूने पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
शोभा ह्या सोमवार(ता.२९सप्टेंबर) देवदर्शनासाठी गेल्या होत्या.त्या माघारी परतत असताना रस्त्यावरील खड्यात दुचाकी आदळून त्या गाडीवरून खाली कोसळल्या.या दरम्यान त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.त्यांनंतर त्यांना कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल केले होते.उपचारादरम्यान शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.सोनाळी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.शांत व मनमिळाऊ स्वभावाच्या शोभा यांच्या आकस्मिक निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती,दोन मुलगे,सुन,दिर,जाऊ,पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.सोनाळी ग्रामपंचायत कर्मचारी सुदेश गुरव यांच्या त्या आई होत.










