ज्यांनी नारायण राणेंचा पराभव केला त्याचा पराभव केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही | निलेश राणेंचा इशारा

Edited by: भरत केसरकर
Published on: July 30, 2023 19:23 PM
views 128  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपत्तीचे सावट असताना येथील आमदार वैभव नाईक हे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसात मश्गूल होते अशा निस्क्रिय आमदाराला आता मतदारच 2024 ला कायमची जागा दाखविणार आहेत. गेल्या नऊ वर्षांत त्यांचे आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी गाजलेले एकतरी भाषण दाखवा विधानसभेत तीस सेकंदापेक्षा जास्त न बोलणारा आमदार विकास काय करणार? असा सवाल भाजप नेते निलेश राणे यांनी आज पिंगुळी कार्यकर्ता मेळाव्यात केला. ज्यांनी नारायण राणेंचा पराभव केला त्याचा पराभव केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा इशारासुद्धा त्यांनी दिला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर यांनी भाजप पक्षात स्वगृही प्रवेश केला.

भाजप पिंगुळी कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने विकास कुडाळकरसह माजी तंटामु्क्त समिती अध्यक्ष विष्णू धुरी व कार्यकर्ते यांचा प्रवेश कार्यक्रम पक्षाचे नेते दत्ता सामंत सरपंच अजय आकेरकर प्रदिप माने यांच्या नेतृत्वाखाली माजी खासदार नीलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंगुळी येथील भवानी मंगल येथे झाला.

यावेळी भाजप नेते दत्ता सामंत तालुका अध्यक्ष दादा साईल, संजय वेंगुर्लेकर, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, बंड्या सावंत, आनंद शिरवलकर, अँड बंड्या मांडकुलकर, मोहन सावंत, विनायक राणे, सरपंच अजय आकेरकर, प्रदिप माने, मोहन रणसिंग, सागर रणसिंग, मंगेश मसके, शशांक पिंगुळकर, विजय कांबळी, रुपेश कानडे, पप्या तवटे, विजय दळवी, ममता राऊळ, साधना माड्ये, अश्विनी कांबळी, सोनाक्षी गावडे, राजवीर पाटील, भाजप कार्यकर्ते आदी उपस्थित होते.