
सिंधुदुर्ग : 21 दिवसांच्या वास्तव्यानंतर सिंधुदुर्गच्या राजाला आज जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेल्या या राजाची भव्य मिरवणूक काढत विसर्जन करण्यात आले. या सोहळ्याला स्थानिक आमदार निलेश राणे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली.
आज सकाळपासूनच निलेश राणे सिंधुदुर्ग राजाच्या दर्शनासाठी उपस्थित होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह महाआरती केली आणि महाप्रसादाचा आस्वाद घेतला. या 21 दिवसांच्या गणेशोत्सवात सिंधुदुर्ग राजाच्या दरबारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे एक वेगळीच रंगत आली होती.
उत्सवाच्या काळात सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येत मनोभावे गणपतीची पूजा केली. बाप्पाला निरोप देताना प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. राजाची मिरवणूक ही पोस्ट ऑफिस कुठे येथून पावशी धरण इथपर्यंत होती. पुढच्या वर्षी लवकर येण्याचे साकडे घालत भाविकांनी आपल्या लाडक्या राजाला निरोप दिला.










