
सिंधुदुर्गनगरी: महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे गुरुवार, १४ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत.
दुपारी २.३० वाजता ओरोस येथे त्यांचे आगमन होईल. दुपारी ३ वाजता ते जिल्हा नियोजन समिती सभागृहात विविध मागण्यांसाठी उपोषणाची नोटीस दिलेल्या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. संध्याकाळी ६ वाजता स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला कणकवली येथे आयोजित तिरंगा रॅलीमध्ये ते सहभागी होतील. ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सुरू होऊन पटवर्धन चौकापर्यंत जाणार आहे.
या दौऱ्यात ते जिल्ह्याच्या विकासासंदर्भात विविध विषयांचा आढावा घेण्याची शक्यता आहे.