
सिंधुदुर्गनगरी : कुडाळ कसाल मार्गावरील ओरोस जैतापकर कॉलनी हा थांबा अचानक एसटी महामंडळाने रद्द केला होता व जिल्हा परिवहन अधिकारी यांच्या सूचने नुसार हा खांबा रद्द करण्यात आल्याचे एसटी महामंडळाचे जिल्ह्याचे वाहतूक अधिकारी श्री विक्रम देशमुख यांनी परिपत्रक काढत सर्व आगारांना हा थांबा रद्द करण्याचे आदेश दिले. याबाबत भाजपा पदाधिकारी निलेश तेंडुलकर यांनी ही बाब जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली होती .त्यानंतर याबाबत जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्हाधिकारी अनिल पाटील,जिल्हा परिवहन अधिकारी श्री.काळे, एसटीचे जिल्हा वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख यांच्याशी संपर्क साधून सदर परिसरासाठी पर्यायी बस थांबा उपलब्ध करून द्यावा अन्यथा पूर्वीप्रमाणे अस्तित्वात असलेल्या बस थांब्यावर सर्व बसेस थांबवण्यात याव्यात अशी आग्रही सूचना केली त्यामुळे एसटी महामंडळाचे अधिकारी विक्रम देशमुख यांनी एस टी महामंडळाच्या गाड्यांचे निरीक्षक यांना पाठवून तेथील परिस्थिती पाहणी केली व सदर थांबा सुरू करण्याचे आदेश दिले.यामुळे कॉलनी परिसरातील प्रवासी आणि विद्यार्थी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत असून त्यांनी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे आभार मानले आहेत.