मुलींसाठी भोसले फार्मसी कॉलेजमध्ये डी. फार्मसी कोर्स आता मोफत

Edited by: विनायक गांवस
Published on: July 11, 2024 09:02 AM
views 264  views

सावंतवाडी : महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी शिक्षण आणि करिअरच्या संधींमध्ये मोठी भर घालण्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता, डी.फार्मसी हा अत्यंत लोकप्रिय आणि उपयुक्त अभ्यासक्रम मुलींसाठी पूर्णपणे मोफत असेल. हा निर्णय यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये लागू झाला असून यामुळे ग्रामीण आणि गरीब कुटुंबातील मुलींसाठी आरोग्य क्षेत्रात करिअर करणे अधिक सोपे होणार आहे.

डिप्लोमा इन फार्मसी (डी.फार्म) हा २ वर्षांचा अभ्यासक्रम आहे. जो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना औषधे आणि औषधोपचारांबद्दल प्रशिक्षण देतो. यामध्ये पदविका शिक्षण घेतलेल्या मुली विविध प्रकारच्या आरोग्य सुविधांमध्ये औषधनिर्माता, औषध विक्रेता आणि आरोग्यसेवा प्रतिनिधी म्हणून काम करू शकतात. हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणून देखील डी.फार्मसी पदविकाधारक चांगले करिअर घडवू शकतात. या निर्णयाचे अनेक फायदे आहेत.मुलींसाठी शिक्षण आणि करिअरच्या संधींमध्ये वाढ मिळेल. यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमधील मोफत शिक्षणामुळे असे उपयुक्त शिक्षण घेण्यापासून वंचित राहणाऱ्या मुलींना आता संधी मिळेल. महिला आरोग्य सेवा क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात आणि हा निर्णय त्यांच्या सहभागाला प्रोत्साहन देईल. ग्रामीण भागात आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होईल. ग्रामीण भागात अनेकदा प्रशिक्षित आरोग्यसेवा व्यावसायिकांची कमतरता असते. यामुळे ग्रामीण भागात आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होईल.

 यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थीनींनी थेट महाविद्यालयात संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा. यासाठी आवश्यक पात्रता विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण अशी आहे. हा एक क्रांतिकारी निर्णय आहे जो निश्चितच महाराष्ट्रातील मुलींसाठी शिक्षण आणि करिअरच्या संधींमध्ये मोठा बदल घडवून आणेल असा विश्वास कॉलेजचे प्राचार्य सत्यजित साठे यांनी व्यक्त केला आहे. अधिक माहितीसाठी ८६००३८०७१७ किंवा ९४०३६८८२१७ या क्रमांकावर संपर्क साधावा.