कणकवली न.पं.च्या लाईनआऊटवरून वादंग

अभियंता सचिन नेरकर आणि व्यापारी यांच्यात खडाजंगी कन्हैया पारकर, प्रसाद अंधारी यांच्या मध्यस्थीमुळे वादावर पडदा
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 22, 2025 20:25 PM
views 77  views

कणकवली : कणकवली बाजारपेठेत न. पं. प्रशासनाकडून बुधवारी रात्री रस्त्यावर लाईनआऊट करण्यात आली. ही लाईनआऊट व्यापारी व घरांच्या उंबऱ्यापर्यंत केल्याने व्यापारी व न. पं. अधिकारी व कर्मचाऱ्यामध्ये शुक्रवारी वांदग झाला. लाईआॅऊटच्या विषयावर  न. प. अभियंता सचिन नेरकर यांनी या लाईनच्या आतमध्ये दुकाने आपली लावावित असे सांगितले.यावर व्यापाऱ्यांनी त्याना विचारणा केली. नेरकर यांनी उडावाउडवीची उत्तरे दिल्याने व्यापारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. अखेर माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर व प्रसाद अंधारी यांनी मध्यस्थी केल्याने या वादावर पडदा पडला. 

गणेशोत्सव काळात शहरात वाहतूक कोंडी व खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्याधिकारी गौरी पाटील अध्यक्षतेखाली नगराध्यक्षांच्या दालनात पोलीस, व्यापारी, भाजी, फळ, फुले विक्रेत्यांच्या यांची बैठक नुकतीच पार पडली. बाजारपेठेत वाहतूक कोडी होऊ नये व गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची गैरसोय होऊ नये याकरिता बाजारपेठेतील रस्त्यात लाईनआऊट करून त्या लाईनबाहेर कोणीही अतिक्रमण करून नये असा निर्णय झाला. याशिवाय नियमावलीही तयार करण्यात आली. त्यानुसार बुधवारी रात्री न. पं. कर्मचाऱ्यानी बुधवारी रात्री बाजारपेठेतील रस्त्यालगत लाईनआऊट केली. ही लाईनआऊट व्यापारी व बाजरातील घरांच्या उंबऱ्यापर्यंत केली गेली. याबाबत गुरुवारी सकाळी व्यापारी व घरमालकांनी न. पं. अभियंता सचिन नेरकर यांना विचारणा केली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावरून व्यापारी व त्यांच्यात वादंग झाला. गतवर्षी पेक्षा यंदा न. पं.ने रस्त्यापासून खूप आत लाईनआऊट केल्याची बाब सचिन नेरकर यांच्या निदर्शनास आणून दिली. यावरून व्यापारी व नेरकर यांच्या शब्दीक बाचबाची झाली. त्यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण होते. तत्पूर्वी न. पं. च्या कर्मचाऱ्यांनी लाईनआऊट केलेल्यात अतिक्रमण केलेल्या व्यापाऱ्यांना  साहित्य हटविण्यास न. पं. कर्मचाऱ्यांनी  भाग पाडले. लाईनआऊटच्या मुद्यावरून व्यापारी व सचिन नेरकर यांच्यात वादंग झाला. अखेर याप्रश्नी माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर व माजी नगरसेवक प्रसाद अंधारी यांनी मध्यस्थी करत व्यापारी व सचिन नेरकर यांच्या चचार्सोबत चर्चा केली. न. पं. प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दुरध्वनीद्वारे पारकर यांनी चर्चा केली. त्यानंतर सचिन नेरकर यांनी नरमाईची भूमिका घेतल्याने या वादावर पडदा पडला. गतवर्षीप्रमाणेच यंदा रस्त्याच्या पांढºया लाईनच्या आतमध्ये आपली आस्थापने लावावीत, असे बजावले गेले आहे. त्यानुसार आम्ही अतितक्रमण करणार नाही, असा शब्द त्यांनी दिला. यावेळी प्रशासकीय अधिकारी अमोल अघम, प्रशांत राणे, रवी म्हाडेश्वर,संतोष राणेे उपस्थित होते.