
दोडामार्ग : भारतीय जनता पार्टीच्या सिंधुदुर्ग जिल्हा युवा मोर्चा संयोजक पदी भाजपचे युवा नेतृत्व तथा दोडामार्ग नगरपंचायतीचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांची निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. कसई- दोडामार्ग नगरपंचायत एकहाती निवडून आणल्या नंतर भाजपशी एकनिष्ठ असलेल्या चव्हाण यांची भाजपमध्ये ताकद अधोरेखित झाली होती.
त्याच पार्श्वभूमीवर पक्षाने आता त्यांच्यावर युवा मोर्चा जिल्हा संयोजक पदाची जबाबदारी सोपविली आहे. दोडामार्ग शहरात शत प्रतिशत भाजप करण्यात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे खंदे समर्थक चेतन चव्हाण व त्यांच्या टीमचा मोठा वाटा होता. आता युवा मोर्चा संघटन साठी जिल्ह्यात जबाबदारी मिळाल्याने चेतन चव्हाण नक्कीच येथही आपली छाप पाडतील, असा त्यांच्या मित्रपरिवाराला ठाम विश्वास आहे.