खड्ड्यांचा ताप ; दुचाकीचा अपघात

Edited by: विनायक गांवस
Published on: December 10, 2025 17:22 PM
views 161  views

सावंतवाडी : मागील काही महीन्यापूर्वी मळेवाड ते आजगाव सावरदेव व मळेवाड जकात नाका येथील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, काही दिवसातच या रस्त्यावरील डांबरीकरण खराब होऊन रस्त्यावर खड्डे पडले. हे खड्डे अजूनही बुजवले नाहीत त्यामुळे येथे वाहने घसरून अपघात घडत आहेत.

वारंवार अपघात घडूनही संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असून याचा त्रास वाहनधारकांना होत आहे. आज सायंकाळी असाच दुचाकीस्वार छोट्या मुलीसह जात असताना गाडी खड्ड्यातील पसरलेल्या खडीवर घसरून पडली. वारंवार असे अपघात घडत असून सुद्धा रस्त्यावरील खड्यांबाबत, पसरलेल्या खडी बाबत संबंधित विभाग, ठेकेदार लक्ष देत नसल्याने  ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.