... अन् ' ते ' पुन्हा उभे राहिले पायावर, फक्त आ. निलेश राणेंमुळे..!

Edited by:
Published on: February 14, 2025 19:22 PM
views 221  views

मालवण : .... टीबीसारख्या दुर्धर आजारामुळे त्यांना अपंगत्व आले...जणू संसारच पांगळा झाला... ऑपरेशनच्या खर्चाचा आकडा एकूण होते नव्हते ते हातपाय ही गळून गेले...सगळे प्रयत्न करून झाले...देवाचा धावा करण्याशिवाय पर्याय नव्हता...तेव्हा मात्र एकच माणूस देवाच्या रुपात उभा राहिला आणि ते पुन्हा पायावर उभे राहिले...त्या देवमाणसाचं नाव म्हणजे आमदार निलेश नारायण राणे..... 

मालवण तालुक्यातील कोळंब खालची वाडी येथील धीरज कांदळगावकर यांना टीबीमुळे डाव्या  पायातील बॉलची झीज झाल्याने त्यांना अपंगत्व आले होते. जे जे रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन शिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. त्यासाठी आधी त्यांना टीबीवर उपचार घेण्यास सांगितले. त्यानंतर पायाचे ऑपरेशन करता येईल असे सांगितले. त्यानंतर कांदळगावकर यांनी टीबीवर उपचार सुरु केले. 2020 पासून त्यांच्यावर टीबीवर उपचार सुरु होते. तोपर्यंत धीरज हे कुबड्यांच्या आधारावर चालत होते. 2024 ला ते टिबीतून बाहेर आले. जानेवारी महिन्यात त्यांनी ऑपरेशनची तयारी सुरु केली. त्या काळात काही ग्रामस्थांनी थोडीफार आर्थिक मदत केली. त्यातून औषधोपचाराचा खर्च झाला. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शासकीय योजनेतून कांदळगावकर यांचं मुंबईत जे जे रुग्णालयात ऑपरेशन झालं होतं. ऑपरेशन नंतर डॉक्टरांनी कांदळगावकर यांना चालण्यास सांगितले असता बसविलेला बॉल पुन्हा निसटला. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पुन्हा ऑपरेशन करावं लागणार असल्याचे सांगितले. मात्र, त्यासाठी दीड लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले. आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या कांदळगावकर यांच्यासमोर मोठं संकट उभं राहिलं. दीड लाख आकडा ऐकून होते नव्हते ते हातपायही गळून गेले. मालवणातील अनेकांशी त्यांनी मदतीसाठी संपर्क करत मदत मागितली. मात्र, कुठूनही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. एवढी मोठी रक्कम कशी उभी राहणार असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. ऑपरेशनचे पैसे भरण्यासाठी हॉस्पिटलकडून विचारणा होत होती. मात्र, कांदळगावकर यांच्याकडे काहीही उत्तर नव्हते. अखेर कुडाळ - मालवणचे आमदार निलेश राणे यांना हा विषय समजताच त्यांनी तात्काळ हॉस्पिटलशी संपर्क साधून कांदळगावकर यांचे ऑपरेशन करण्यास सांगितले. त्यानुसार 10 फेब्रुवारीला त्यांचे ऑपरेशन झाले. आमदार निलेश राणेंच्या एका फोनवर कांदळगावकर यांचे ऑपरेशन यशस्वी  झाले. त्यामुळे आज पाच वर्षानंतर कोळंब येथील धीरज कांदळगावकर  हे पुन्हा एकदा दोन्ही पायावर चालू शकणार आहेत. आमदार निलेश राणे यांनी मदत केली नसती तर माझे ऑपरेशन कधी झाले असते माहिती नाही. दीड लाख रुपये कुठून आणणार हा मोठा प्रश्न आपल्यासमोर होता, असे सांगत धीरज कांदळगावर आणि कुटुंबियांनी आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत. एकीकडे कोट्यावधींची विकासकामे उभारताना अगदी सामान्य नागरिकांच्या अशा समस्यांकडे आत्मियतेनं लक्ष देणाऱ्या आमदार निलेश राणे यांच्या या कार्याचं कौतुक होतंय.