
वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या व्यापारी एकता मेळाव्याला वेंगुर्ला इथं मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. जिल्हयाभरातून या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने व्यापारी बांधव उपस्थित झाले आहेत. या मेळाव्यात व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. या मेळाव्याचे थेट प्रक्षेपण तसेच स्पेशल कव्हरेज आपण कोकणचे नंबर 1 महाचॅनेल कोकणसाद LIVE वर दिवसभर पाहू शकता.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघातर्फे देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार हा सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष तसेच वेंगुर्ले तालुका व्यापारी संघाचे बरीच वर्षे अध्यक्षपद भुषविलेले व गेली ३० वर्षे जिल्हा व्यापारी महासंघाच्या कार्यकारीणीवर काम करीत असलेले, त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी पतसंस्था संस्थापक असलेले व १२ वर्षे अध्यक्षपद भुषविणारे, सिंधुदुर्ग जिल्हा कंन्झुमर डिस्ट्रीक असोसिएशनचे संस्थापक व माजी अध्यक्षपद अशी पदे भुषविलेले, गेली १९७२ पासून सुमारे ५० वर्षे व्यापार व्यवसायात कार्यरत असलेले आणि नगर वाचनालय वेंगुर्ले या संस्थेची धुरा सामाजिक काम म्हणून सांभाळणारे अनिल श्रीकृष्ण सौदागर यांना प्रदान करण्यात येईल.
वेंगुर्ले भटवाडी येथील नर्मदा कँश्यू फँक्टरीच्या माध्यमातून सन १९८३ पासून अनेक महिलांना रोजगार देणाऱ्या तसेच सुमारे ५० ते ६० कुटुंबांना जोडणाचे काम केलेल्या आणि महाराष्ट्र चेंबर आँफ काँमर्सचा महिला उद्योजक पुरस्कार पटकाविलेल्या सौ. मंदाकिनी दिलीप सामंत यांची श्रीमती माई आरोसकर महिला उद्योजक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
या दोन्ही पुरस्काराचे वितरण व्यापारी एकता मेळाव्यात करण्यात येणार आहे.