
ADB रस्ते विकास कार्यक्रम अंतर्गत राज्य शासनाची मंजुरी
मालवण : आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार सिंधुदुर्गनगरी येथील प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते रानबांबुळी मालवण कट्टा चौके ते देऊळवाडा रस्ता या कामासाठी राज्य सरकारने ३०५ कोटींचा निधी मंजूर केला असून आमदार निलेश राणे यांनी आपल्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली आहे.
या पूर्ण रस्त्याची लांबी ३० की. मी. असून याची ०७ मीटर रुंदीने या रस्त्याचे काँक्रीटीकरण होणार आहे. या रस्त्यावरील धोकादायक वळणे व दरडप्रवन भागात संरक्षकभिंती तसेच जीर्ण झालेल्या पुलांच्या जागी नवीन पूल बांधकाम करणे, सखल भागात भर टाकून रस्त्याची उंची वाढविणे अशा प्रकारची कामे होणार आहेत.
हा रस्ता पर्यटनासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार असून मालवणमध्ये जाणाऱ्या पर्यटकांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी गेल्या अनेकवर्षांपासून होत होती, त्याची दखल घेऊन आमदार निलेश राणे यांनी आपल्या विकास आराखड्यात या रस्त्याचा समावेश केला होता, राज्य सरकारच्या मंजुरीमुळे आमदार निलेश राणे यांच्या विकास आराखड्यातील महत्वाचे काम पूर्ण झाले असून आमदार निलेश राणे यांनी याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार नारायणराव राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार व्यक्त करत केले आहेत.











