त्या तरुणांच्या कुटुंबियांचं वैभव नाईकांनी केलं सांत्वन

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 21, 2025 14:19 PM
views 899  views

आचरा : नारिंग्रे येथे एसटी आणि रिक्षा यांच्यात झालेल्या दुर्दैवी अपघातात आचरा येथील संकेत सदानंद घाडी, संतोष रामजी गावकर, सुनील सूर्यकांत कोळंबकर आणि रोहन मोहन नाईक या चार तरुणांचे दुःखद निधन झाले आहे. या दुर्दैवी घटनेबाबत माजी आमदार वैभव नाईक यांनी शोक व्यक्त करत आज तरुणांच्या अंत्ययात्रेत ते सहभागी झाले. तसेच कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करत त्यांना धीर दिला.

यावेळी  शिवसेना आचरा विभागप्रमुख समीर लब्दे, विभाग संघटक मंगेश टेमकर, विभाग संघटक पप्पू परुळेकर, आचरा देवस्थान मानकरी आबा सावंत, उपविभाग प्रमुख सचिन रेडकर, उपविभाग प्रमुख अनिल गावकर, मच्छीमार नेते नारायण कुबल, श्रीकृष्ण वायंगणकर, मुन्ना परब, नितीन घाडी, दिलीप कावले, परेश तारी, संजय वायंगणकर, पळसंब उपसरपंच अविराज परब, तोंडवली उपसरपंच हर्षद पाटील, सुनील माळकर, सुदंर आचरेकर व आचरा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.