राज्यातील बेरोजगार तरुणांना विविध कौशल्यांच्या सहाय्याने रोजगार शोधता यावा आणि औद्द्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना उपलब्ध असलेले कुशल/ अकुशल कामगाराचा शोध घेणे सोपे होण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने ‘महाजॉब्स’ नवीन पोर्टल सुरु केलं आहे.
कंपन्यांना हवे असलेल्या नोंदणीकृत कामगारांची माहिती पोर्टलवर उपलब्ध होत असल्याने बेरोजगार आणि रोजगार देणारे (कारखाने) मधील अंतर कमी झाल्याने पोर्टलच्या माध्यमातून भूमीपुत्रांना पारदर्शकपणे रोजगार किंवा नोकरी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. यासाठी औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात (कंपनी) काम/ नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या बेरोजगारांनीच खाली दिलेल्या लिंकवर जाऊन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
१) ‘महाजॉब्स’ नोंदणीसाठी http://mahajobs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल.
२) प्रथम तुमचे नाव टाईप करा.
३) तुमचा मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी मिळवा, मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून पडताळणी करा. तसेच ईमेल आयडी टाकून ओटीपी मिळवा आणि ई-मेल वर ओटीपी पडताळणी करून घ्या.
टीप – ईमेल आयडी पर्यायी आहे परंतु आपण सादर केल्यास पडताळणी अनिवार्य आहे. ईमेल आयडी पोर्टलवरील संवादासाठी वापरली जाऊ शकते, याची कृपया उमेदवारांनी नोंद घ्यावी. (Email ID is optional but verification is mandatory if you enter. Email ID can be used for communication on portals such as job notifications etc. It can also be used as a user ID to log in to the portal.)
४) आपल्या आवडीचा किंवा हवा असलेला मनाप्रमाणे पासवर्ड टाकून परत एकदा पासवर्डची पुष्टी करा.
५) त्यानंतर दिसत असलेला कॅपच्या (captcha) व्यवस्थित टाईप करून सबमिट करा.
पासवर्ड – प्रथम आपला पासवर्ड हा कॉम्प्लेक्स असावा हे लक्षात ठेवून त्यात किमान 8 कॅरेक्टर्स असावे, तसेच पासवर्डमध्ये किमान 1 कॅपिटल अक्षर+1 लोअरकेस अक्षर , 1 नंबर आणि 1 स्पेशक कॅरेक्टर्स (जसे $, @, #) असणे आवश्यक असून आपल्या पासवर्डची नोंद करून ठेवायला विसरू नका. (Password Length should be minimum 8 characters and maximum 20 characters. Password must contain atleast 1 UpperCase Alphabet, 1 LowerCase Alphabet, 1 Number and 1 Special Character.)
६) त्यानंतर सदरील युजरनेम आणि पासवर्ड द्वारे लॉगिन करून तुमची शैक्षणिक संबंधित सर्व माहिती भरणे आवश्यक आहे.
७) तसेच शैक्षणिक माहिती बरोबरच तुम्ही एखाद्या कामामध्ये पारंगत, कुशल असल्यास तुमच्या कौशल्याविषयी माहिती भरू शकता.
८) तुम्ही सर्व माहिती भरून नोंदणी करुन सबमिट केल्यानंतर ‘Registration done successfully’ असा मेसेज येईल, मेसेज आल्यानंतर आपली नोंदणी पूर्ण होईल…