ब्युरो न्यूज : भारतीय मध्य रेल्वे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५९६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी २८ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत. यात लघुलेखक, वरिष्ठ व्यावसायिक लिपिकसह तिकीट लिपिक, गुड्स गार्ड, स्टेशन मास्तर, कनिष्ठ लेखा सहायक, कनिष्ठ व्यावसायिक आणि लेखा लिपिक पदाच्या ५९६ जागा आहेत. इच्छुकांनी ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन केले आहे.