कॅल्शियम कमी झाल्यास काय करावे?

Edited by: ब्युरो
Published on: November 01, 2023 12:20 PM
views 263  views

धावपळीच्या युगात आपण थकतो. अनेकवेळी हाडे दुखतात. थकवा जाणवतो. हे नव्या जीवनशैलीमुळे घडत असते. शर्करायुक्त पदार्थांमुळे (चॉकलेट, केक, कोल्डड्रिंक्स इ.) शरीरात कॅल्शियमची कमतरता होते. मात्र, हे कॅल्शिअम घरगुती पदार्थ खाऊन वाढविता येते. त्यासाठी औषधाची गरज नाही.

दूध - गाईचेदूध कॅल्शियमचा सर्वात उत्तम स्रोत आहे. यामुळे केवळ मुलेच नाही तर प्रौढ व्यक्तीसुद्धा पर्याप्त प्रमाणात कॅल्शियम प्राप्त करू शकतात. दुधाच्या माध्यमातून शरीरात जाणारे कॅल्शियम जास्त फायदेशीर असते. (देशी गाईचे दुध दही आसावे)

दही - दहीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते. एका बाउल दहीमध्ये ४०० मि.ग्रॅ. कॅल्शियम असते. दुधापासून तयार इतर पदार्थ सेवन करून कॅल्शियम मिळते.

पालेभाज्या - हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळून येते. पालक, शलजम, कोबी, इ.

शेंगभाज्या - शेंगभाज्या शरीरासाठी खूप लाभदायक ठरतात. यामुळे शरीराला प्रोटीनसोबतच कॅल्शियम मिळते

संत्री-लिंबू - संत्री, लिंबू यासारख्या फळांमधून शरीराला कॅल्शियम तसेच व्हिटॅमिन डी आणि सी मिळते. डी व्हिटॅमिनचा विशेष गुण म्हणजे, हे शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते.

सोयाबीन - सोयाबीन पौष्टिक असून यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. या व्यतिरिक्त हे फायबर, प्रोटीन, आयर्न आणि कार्बोहायड्रेटचा उत्तम स्रोत आहे.

गूळ - गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियमचे असते. परंतु कॅल्शियमच्या पूर्तीसाठी गुळाचे जास्त सेवन करणे ठीक नाही. गुळामध्ये कॅल्शियमसोबतच फोस्फोरससुद्धा असते. जे शरीरासाठी उत्तम मानले जाते आणि हाडांना निरोगी ठेवण्यास मदत करतो.

तीळ- भाकरीला तीळ लावून खाणे किंवा जेवणानंतर एक ते दोन चमचे तीळ खाणेही उत्तम