
ब्युरो न्युज : अनेकदा आपण दुकानातून पाण्याची बाटली विकत घेतो आणि महिनोनमहिने त्यातून पाणी पितो. अनेकदा तिचं बाटली आपल्या फ्रिजमध्येही जागा घेते. पण वेळोवेळी ती बाटली स्वच्छ केली तर ठीक नाही तर फक्त पाण्याने धुवून पुन्हा वापरली जाते. पण तुम्ही देखील असे करत असाल तर सावधान व्हा. कारण एका अभ्यासातून पुन्हा वापरता येणाऱ्या पाण्याच्या बाटलीबाबात धक्कादायक खुलासा झाला आहे. या अभ्यासानुसार, पुन्हा वापरता येणाऱ्या पाण्याच्या बाटलीमध्ये लाखो बॅक्टेरिया असू शकतात.
अमेरिकेतील वॉटर फिल्टर गुरु या संस्थेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, पुन्हा वापरता येण्याजोग्या पाण्याच्या बाटलीमध्ये टॉयलेट सीटपेक्षा सुमारे ४०,००० पट जास्त बॅक्टेरिया असू शकतात, असा धक्कादायक खुलासा झाला आहे. या बाटलीला आता पोर्टेबल बॅक्टेरिया हाऊस म्हणून ओखळले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या बाटलीत इतके धोकादायक बॅक्टेरिया आहेत की, जे तुमच्यामध्ये अशाप्रकारची क्षमता निर्माण करतात ज्यामुळे शरीरावर औषधांचाही कोणताही परिणाम होणार नाही. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, जर तुम्हाला एखादी दुखापत किंवा रोग झाला तर तो बरा करण्यासाठी तुम्ही औषधांचा वापर केला तरी त्या औषधांचा कोणताही परिणाम होणार नाही. म्हणजेच तुमची दुखापत, रोग बरा होणार नाही. तसेच यातील अनेक बॅक्टेरियामुळे आतड्यांसंबंधीत आजार होऊ शकतात.
बाटली धुतल्यानंतरही बॅक्टेरिया राहतात
अभ्यासानुसार, घरगुती पद्धतीने बाटली धुतल्यानंतरही त्याचत किचन सिंकच्या तुलनेत दुप्पट बॅक्टेरिया राहतात. इतकेत नाही तर कॉम्प्युटरच्या माऊसपेक्षा ४ पट आणि प्राण्यांच्या पाणी पिण्याच्या भांड्याच्या तुलनेत १४ पट अधिक बॅक्टेरिया त्या बाटलीत लपलेले असतात. इंपीरियस कॉलेज ऑफ लंडनचे शास्त्रज्ञ डॉ. अँड्र्यू एडवर्ड्स म्हणाले की, या बाटलीमुळे माणसाचे तोंड बॅक्टेरियाचं सर्वात मोठ घर बनले आहे. ही पाण्याची बाटली बॅक्टेरियासाठी एक प्रजननची जागा बनली असून ते खूप वेगाने वाढत आहेत.
यापूर्वी झालेल्या संशोधनात आढळले होते की, तुम्ही वापरल असलेल्या बाटलीमध्ये प्रत्येक सेंटीमीटरच्या जागेत सुमारे ९ लाख बॅक्टेरिया असतात. हे टॉयलेट सीटपेक्षा खूप जास्त आहेत. यावर ट्रेडमिल रिव्ह्यूज नावाच्या संस्थेने आठवड्याभर खेळाडूंनी वापरलेल्या पाण्याच्या बाटल्यांचा अभ्यास केला. तेव्हा असे आढळून आले की, पाण्याच्या बाटल्यांच्या एका सेंटीमीटर भागात सुमारे ९०.००० बॅक्टेरिया राहत असतात. त्यामुळे बाहेरून विकत घेत असलेली ही पाण्याची बाटली अनेक आजारांचे कारण बनू शकते. त्यामुळे पुन्हा वापरण्या योग्य पाण्याची बाटली आठवड्यातून एकदातरी गरम पाणी आणि साबणाने धुवावी.














