सारा खानच्या एअरबीएनबीवर खास वेलनेस - योगा रिट्रीट

Edited by:
Published on: November 22, 2024 11:48 AM
views 119  views

गोवा : बॉलिवूड अभिनेत्री, फिटनेस आणि प्रवासाची आवड असलेली सारा अली खान प्रथमच गोव्यातील शांत आणि निसर्गरम्य एअरबीएनबी मध्ये एका गटासाठी खास वेलनेस आणि योगा रिट्रीट आयोजित करणार आहेत. बुकिंगसाठी २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरू होतील. हे तीन दिवस आणि दोन दिवसांचे रिट्रीट ₹० मध्ये उपलब्ध असेल. पाहुण्यांची निवड ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर होईल, आणि प्रत्येक पाहुण्याला आणखी तीन लोकांना सोबत घेऊन येण्याची परवानगी असेल.  हिरवळीने नटलेल्या गोव्याच्या निसर्गसंपन्न प्रदेशात आयोजित होणारं हे आदर्श विश्रांतीचं एक आदर्श ठिकाण ठरणार आहे. त्यामुळे संपूर्ण आरोग्य जपण्यासाठी आणि मन:शांती मिळवण्यासाठी एक उत्तम संधी निर्माण होणार आहे.

फिटनेसप्रती असलेली निष्ठा आणि सिनेमासृष्टीतील करिअर यांचा उत्तम समतोल राखणारी सारा आता तिच्या वेलनेस आणि योगाप्रती असलेल्या आवडीला गोव्यातील एअर बीएनबीवर घेऊन येत आहे. या रिट्रीटमध्ये पाहुण्यांना सारा बरोबर सुंदर निसर्गरम्य ठिकाणी योगाभ्यास करण्याची संधी मिळणार आहे, तसेच तिच्या वैयक्तिक वेलनेस रूटीन आणि रहस्यांची माहिती घेण्याची संधीही मिळेल. साराबरोबर एक मिट अँड ग्रीट ची संधी मिळणार आहे .

" गोव्यातील एअर बीएनबीवर असेलल्या या खास वेलनेस आणि योगा रिट्रीटसाठी पाहुण्यांचं स्वागत करण्यास मी अतिशय उत्सुक आहे,. निसर्गसौंदर्याने भारलेल्या या ठिकाणी, आपण मन, शरीर आणि आत्म्याचं पोषण करण्यावर लक्ष केंद्रित करणार असून काही अविस्मरणीय आठवणींना आकार देणार आहोत. विसाव्याचे, नव्याने जोडले जाण्याचे आणि जीवनातील साध्या क्षणांचा आनंद घेण्याची ही एक मौल्यवान संधी आहे," असे सारा अली खान म्हणाली.

एअरबीएनबीने २०२२ मध्ये गोवा पर्यटन विभागासोबत एक सामंजस्य करार केला. गोव्याच्या शांत भागांचे आणि त्याच्या अनोख्या होमस्टे इकोसिस्टमचे प्रमोशन करण्यावर या करारात भर दिला गेला होता. या कराराद्वारे गोव्याचे सौंदर्य केवळ समुद्रकिनाऱ्यांपलीकडे नेण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास एअरबीएनबी पूर्ण सहकार्य करत आहे. त्यामुळे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना शांतता, संस्कृती आणि निसर्गाशी जोडून घेण्याची संधी मिळेल.

"सारा अली खान एअरबीएनबीची होस्ट म्हणून सामील झाल्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. भारतीय प्रवासी जेव्हा जेव्हा पर्यटन स्थळांशी निगडीत अनोखे आणि समर्पक अनुभव शोधतात. बॉलिवूडचा सांस्कृतिक प्रभाव लक्षात घेता, हे रिट्रीट अन्य कुठल्याही रिट्रीटसारखे नसेल. तसेच, आरोग्य पर्यटन ही एक नवीन प्रवासी प्रवृत्ती म्हणून एक उत्तम संधी आहे," असे एअरबीएनबीचे भारत, दक्षिण-पूर्व आशिया, हाँगकाँग आणि तैवानचे जनरल मॅनेजर अमनप्रीत बजाज यांनी सांगितलं”.

"गोवा हे वेलनेस डेस्टिनेशन म्हणून विकसित होत असून राज्याच्या अद्वितीय वैविध्याचं ते उत्कृष्ट उदाहरण आहे. एअरबीएनबी बरोबरच्या भागीदारीने प्रवाशांना गोव्यात शोधता येतील, जपता येतील आणि साजरे करत येतील अशा उच्च-गुणवत्तेच्या पर्यटनासाठी असे अनुभव देण्यासाठी कटिबद्ध आहोत,” असे गोव्याचे पर्यटन मंत्री श्री. रोहन खंवटे यांनी सांगितलं.