वेंगा फिटनेस फायटर ग्रुप तर्फे नवरात्री 9X9 मिशन

तंदुरूस्ती - आरोग्याचा जागर
Edited by: दिपेश परब
Published on: September 09, 2025 13:12 PM
views 346  views

वेंगुर्ला : सुदृढ आरोग्यासाठी माणसाने दिवसातून किमान काही वेळ चालावे किवा धावावे गरजेचे असून समाजामध्ये व्यायामाविषयी जनजागृती करणे या उद्देशाने वेंगा फिटनेस फायटर ग्रुपतर्फे सलग तिस-या वर्षी ‘नवरात्री  ९ x ९ मिशन चालणे किंवा धावणे' म्हणजेच तंदुरूस्ती व आरोग्याचा जागर आयोजित केला आहे. या मिशनमध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग असावा यासाठी आगळीवेगळी युनिक पद्धत आयोजनामध्ये वापरण्यात आली आहे, अशी माहिती आयोजकांच्यावतीने डॉ.प्रल्हाद मणचेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वेंगुर्ला येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला डॉ.राजेश्वर उबाळे, प्रदीप वेंगुर्लेकर, शिवदत्त सावंत आदी उपस्थित होते. ‘वेंगा फिटनेस फायटर‘ हा ग्रुप वेंगुर्ल्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा फिटनेसबाबत जागृतीसाठी केलेला ग्रुप आहे. या ग्रुपतर्फे दरवर्षी नवरात्र उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. ज्यामध्ये ९ दिवस आपण रोज ३ किमी पासून पुढे कितीही किलोमिटर आपल्या वेळेनुसार चालायचे असते. तसेच चालण्याचे ठिकाण हे तुमचे जिल्ह्यात किवा जिल्ह्याबाहेर असू शकते, देशात किवा देशाबाहेर पण असू शकते. फक्त त्याची नोंद आमच्या ग्रुपवर करणे आवश्यक आहे. या मिशनसाठी २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंतचे रेकॉर्ड ठेवले जाईल. असे केल्यानंतर शेवटच्या दिवशी म्हणजे ५ ऑक्टोबर रोजी रविवारी त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेतला जाईल. यात टी-शर्ट, मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. हा कार्यक्रम वेंगुर्ला - कॅम्प येथे घेण्यात येणार आहे.

या मिशन कालावधी फिटनेसबद्दल तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे आणि योगाचा अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन पण होणार आहे. सत्कार समारंभात मेडल देण्यात येईल. या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी व्ही.प्रदीप ७४२०८०८४१६ किवा ९४२०७४२४४० या मोबाईल नंबर वरून किवा https://forms.gle/DMDrgoRcPS9qWvAJ9 या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

या कार्यक्रमाची नोंदणी सुरू झालेली आहे. आतापर्यंत २०० लोकांनी यांची नोंद केली आहे ते सर्व वेंगुर्ला आणि इतर जिल्हा तसेच देशाबाहेरचे सुद्धा आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या मिशनमध्ये सहभागी व्हावे आवश्यक आहे. जे अजून काहीच व्यायाम करत नाहीत त्यांनी किमान चालण्याचा व्यायाम सुरु करावा. थोड चालणा-यांनी जरा जास्त व नियमित चालावे तसेच जलद चालावे तरच हृदयाला व शरिराला ते फायदेशीर आहे. हे सर्वांना समजावे हा या मिशनचा उद्देश आहे त्यामुळे प्रत्येकाने सहभाग घ्यावा असे आवाहन डॉ. मणचेकर यांनी केले आहे.