ब्युरो न्यूज : थंडीच्या दिवसात प्रोटीन आणि कॅलरीयुक्त आरोग्यदायी पदार्थ खाणं फार महत्त्वाचे असतं. अशावेळी तुम्ही चवीला गोड असणारा खरवस खाऊ शकता. त्यामुळे घरच्या घरी खरवस कसा बनवायचा हे पहा. यासाठी 1 लिटर पहिल्या दिवसाचा दुधाचा चिक, 1 लिटर दूध, 200-250 ग्रॅम साखर, 2-3 चिमूट केशर, 1/2 चमचा वेलचीपूड हे साहित्य लागेल.
कृतीवेळी केशर थोडे कोमट करून 1/4 वाटी दुधात भिजत घालून ठेवावे. त्यानंतर चिक आणि दुध एकत्र करून त्यात साखर घालावी. साखर विरघळेपर्यंत ढवळावे. नंतर केशर आणि वेलची पूड घालून मिक्स करावे. त्यानंतर कुकरचे 2 मोठे डबे घ्यावे. डब्यात तयार मिश्रण सारखे विभागून घालावे. कुकरच्या तळाशी दीड इंचभर पाणी घालावे. एक डबा पकडीच्या मदतीने आत ठेवावा. त्यावर ताट ठेवून त्यावर अजून एक डबा ठेवावा. वर अजून एक ताट ठेवावे आणि झाकण लावून 2 शिट्ट्या कराव्यात. शिट्ट्या झाल्यानंकर आच बारीक करून गॅस बंद करावा. 5-6 मिनिटांनी कुकरचे प्रेशर गेल्यावर झाकण काढून दोन्ही डबे बाहेर काढावे.नॉर्मल गार झाल्यानंतर ते फ्रीजमध्ये 1-2 तासासाठी ठेवावे. आता फ्रिजमधून बाहेर काढून त्याचे हवे तसे काप करावे आणि तयार खरवस सर्वांना सर्व्ह करावा