हे कफ सिरप तुमच्या मुलांना देताय तर सावधान !

Cough Syrup मुळे 66 बालकांचा मृत्यू?
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 06, 2022 11:04 AM
views 1803  views
हायलाइट
भारतीय बनावटीच्या कफ सिरपची चाचणी होणार

नवी दिल्ली : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने बुधवारी इंडियाज मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेडने बनवलेल्या 4 कफ सिरपबाबत अलर्ट जारी केलाय. डब्ल्यूएचओने एक चेतावणी देत म्हटलंय म्हटलंय की, हे सर्दी-खोकला सिरप गॅम्बियामध्ये 66 मृत्यू आणि गंभीर समस्यांसाठी जबाबदार असू शकतात. अहवालानुसार, या सिरपमध्ये डाएथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलची अस्वीकार्य मात्रा असल्याचं समोर आलं आहे, जी माणसांसाठी अत्यंत धोकादायक आहेत.

वैद्यकीय उत्पादनाचा इशारा जारी करताना डब्ल्यूएचओने सांगितलं की, 'चारही कफ सिरपच्या नमुन्यांच्या प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलची अस्वीकार्य मात्रा आढळून आली आहे.' त्यात असंही नमूद करण्यात आलंय की, दूषित उत्पादनं आतापर्यंत फक्त द गॅम्बियामध्ये आढळून आली आहेत. परंतु ते इतर देशांमध्ये वितरित केले जाण्याची शक्यता आहे. सध्या WHO कंपनी आणि नियामक प्राधिकरणांसोबत याची चौकशी करतंय.

डब्ल्यूएचओ मेडिकल प्रोडक्ट अलर्टने म्हटलंय की, सप्टेंबरमध्ये नोंदवलेली चार निकृष्ट प्रोडक्ट म्हणजे प्रोमेथाझिन ओरल सोल्युशन, कोफॅक्समॅलिन बेबी कफ सिरप, मॅकॉफ बेबी कफ सिरप आणि मॅग्रिप एन कोल्ड सिरप. हे सर्व सिरप हरियाणातील मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेडने बनवलं आहेत.