
वैभववाडी : ग्रामीण रुग्णालय व अथायु हॉस्पिटल कोल्हापूर याच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व ऑपरेशन शिबीर दिनांक ३० जुलै बुधवारी सकाळी ११ ते २ ह्या वेळे मध्ये ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येते आयोजित केले आहे. ह्या शिबीर मध्ये मोफत हृदयविकार, अँजिओग्राफ़ी, पित्ताशात खडे, मुतखडा, प्रोस्टेट, कॅन्सर, केमोथेरपी, व्हेरिकोज व्हेन्स, मणका तपासणी, गुढघे व हाडाची तपासणी होणार आहे.
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना अत्तर्गत अँजिओप्लास्टी, बायपास, हृदयाचे व्हॉल्व बदलणे, दुर्बिणीद्वारे मुतखडा ,दुर्बिणीद्वारे प्रोस्टेट,दुर्बिणीद्वारे पित्ताशाचे खडे, हाडाचे फ्रॅक्चर, सर्व प्रकारचे कॅन्सर, केमोथेरपी,डायलेसीस, लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार,वाढलेली थायरॉईड गाठी वर मायक्रोवेव द्वारे (विना ऑपरेशन)अत्याधुनिक उपचार, विना टाके गर्भाशय गाठी वर उपचार, पायांची पेरिफरल अँजिओप्लास्टी (मधुमेह मुळे पायाला झालेली इजा) ,प्रोस्टेट आर्टरी एम्बोलायझेशन हे उपचार सर्व रेशन कार्ड व आधार कार्ड धारकांना मोफत ऑपरेशन करण्यात येणार आहेत, तसेच सवलतीच्या दरात ऑपरेशन हॅर्निया,अपेंडिक्स, मूळव्याध, फिशर,फिस्टुला करण्यात येणार असून मुख्यमंत्री वैधकीय सहायता निधी व इतर ट्रस्ट मार्फत गुडघे, खुबा प्रत्यारोपण व दुर्बिणीद्वारे गुडघ्याचे लिगामेंट ऑपरेशन ह्या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे तसचे शिबीर दिवशी ई.सी.जी, रक्तातील साखर तपासणी, रक्तदाब, प्रोस्टेट विशिष्ट अँटीजेन टेस्ट, लघवीची धार तपासणी मोफत करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त सातारा जिल्ह्या मधील सर्व रुग्णांनी लाभ घ्यावा असे आयोजक कडून करण्यात आले आहे