सिंधुदुर्ग : अँजिओप्लास्टी आणि बायपाससारख्या शस्त्रक्रिया खरंच टाळता येतात का? असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र यावर दिलासादायक उत्तर हवं असेल तर आपल्याला एक अत्यंत चांगला पर्याय म्हणजे माधवबाग. ब्लॉकेजेस, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, हृदयाची कार्यक्षमता कमी होणे, अशा हृदयरोगी रुग्णांना नेहमीच आपल्या आरोग्याची धास्ती असते. हा आजार खूपच खर्चिक असल्याचा गैरसमजही असतो. परंतु यासंदर्भात जनजागृती करणे तसेच गैरसमज दूर करणे आणि अत्यंत कमी खर्चात चांगले उपचार करण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून माधवबाग अथकपणे करत आहे.
यासंदर्भात जनजागृतीसाठी आणि अशा रुग्णांना सहकार्य करण्यासाठी ते नेहमीच विशेष तपासणी शिबिरांचे आयोजन करत असतात. दिनांक 13 ते 18 एप्रिल 2023 यादरम्यान अशाच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत माधवबागच्या कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी इथल्या शाखेमध्ये होईल. यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. एन्जोप्लास्टी आणि बायपाससारख्या शस्त्रक्रिया खरंच टाळता येतात का, माझ्या हृदयावर शस्त्रक्रिया न करता हृदयाची खालावलेली स्थिती सुधारू शकते का, हृदयरोगाबरोबर माझा मधुमेह, उच्च रक्तदाब, नियंत्रणात राहू शकतो का? अँजिओप्लास्टी व बायपास शस्त्रक्रिया झाल्यावर सुद्धा होणारा त्रास टाळता येईल का? ज्या रुग्णांना वयोमर्यादेमुळे शस्त्रक्रिया टाळली जाते अशा रुग्णांवर माधवबागमध्ये इलाज होऊ शकतो का? शस्त्रक्रियेवरील मोठा खर्च टाळता येऊ शकतो का, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये रुग्णांना मिळतील. हृदय तपासणी, हृदयाचे ठोके तपासणी, रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजन प्रमाण तपासणी, टेस्ट रँडम सुगर, याशिवाय तज्ञ डॉक्टरांकडून या शिबिरात मार्गदर्शनही देण्यात येईल.
नाव नोंदणीसाठी संपर्क : कणकवली 9373183888, कुडाळ 9011328581, सावंतवाडी 7774028185, माधवबाग मल्टी डिसिप्लिनरी कार्डियाक केअर क्लिनिक्स ॲन्ड हॉस्पिटल्स