सावंतवाडी : सावंतवाडी व कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे सिटीस्कॅन व एम आर आय मशिनरी, ओरोस जिल्हा रुग्णालय येथे एम आर आय मशीनसाठी कृष्णा डायनोस प्रायव्हेट लिमिटेड पुणे कंपनीमार्फत युद्धपातळीवर काम सुरू आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपसंचालक भीमसेन कांबळे, शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील, वैद्यकीय अधिकारी सुबोध इंगळे यांची संयुक्त बैठक घेऊन मशीनरी मंजूर करण्यात आल्या आहेत. ही ईश्वरी सेवा तसेच गोरगरीब रुग्णांची रुग्णसेवा असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेच्यावतीने जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांनी धन्यवाद देऊन आभार मानले आहेत. अनेक वेळा पालकमंत्र्यांनी आदेश देऊनही अधिकारी वर्ग तात्काळ त्याची अंमलबजावणी करत नसल्याने जटिल असे प्रश्न सुटत नाही. परंतु अधिकाऱ्यांची मानसिकता सुद्धा रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी मागणीचा विचार करून तात्काळ ही मशिनरी बसवण्यासाठी पाठपुरावा व कंपनीचे पत्र व्यवहार अधिकारी वर्गाने केल्याने हा प्रश्न सुटत आहे.
याची मागणी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी करत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच लक्ष वेधल होत. त्याला पालकमंत्री तसेच अधिकारी वर्गाने प्रतिसाद देऊन मान्यता दिली आहे. गोरगरीब जनतेला तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यानी केलं आहे.
मशिनरी बसवण्यासाठी पुणे येथील प्रायव्हेट कृष्णा डायनोस लिमिटेड मार्फत इमारतीमध्ये अंतर्गत बांधकाम वेगाने सुरू आहे. तसेच कणकवली येथे सुद्धा उपजिल्हा रुग्णालयामध्ये लवकरच रूमचे बांधकाम होऊन सिटीस्कॅन व एम आर आय मशीन सावंतवाडी व कणकवली उपजिल्हा रुग्णालय तसेच ओरोस येथे जिल्हा रुग्णालयामध्ये एम आर आय मशीन लावून देण्यात येणार आहे. तीन ते चार महिन्यांमध्ये काम पूर्ण होऊन मशिनरी लावण्यात येणार आहे अशी माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठाचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली आहे.
त्या मशिनरीला लागणारे टेक्निशन व कर्मचारी या कंपनीमार्फत नेमणूक होऊन कंपनीमार्फत शासनाच्या दरसूची प्रमाणे तसेच साठ वर्षावरील आधार कार्डची झेरॉक्स प्रत दिल्यास, वीस हजाराच्या आत कुठल्याही वयोगटातील व्यक्तीला तहसीलदारकडून उत्पन्नाचा दाखला दिल्यास त्याचप्रमाणे अंध अपंग मूकबधिर कर्णबधिर मतिमंद तसेच पोलीस केस असलेल्या रुग्णावरती कंपनी मार्फत शासनाच्या निकषाप्रमाणे अशी सेवा मोफत दिली जाते.अशी माहिती राजू मसुरकर यांनी दिली आहे. या मशीनला विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर त्याला लागणारा जनरेटरची सोय या कंपनीमार्फत देण्यात येणार आहे. यामुळे रुग्णांची चिंता सुद्धा दूर होणार आहे.
जिल्ह्यातील मशनरी लावण्यासाठी प्रत्यक्ष राजू मसूरकर यांनी फोन द्वारे तसेच निवेदन देऊन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी बोलणे करून आग्रहाची मागणी केली होती. हि मशीनरी मंजूर केल्यामुळे माजी आमदार राजन तेली तसेच भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पालकमंत्र्यांशी पाठपुरावा करून मसूरकर यांच्या मागणीनुसार गोरगरीब रुग्णांसाठी सेवा मिळावी असा त्यांनी पाठपुरावा केला. त्याबद्दल त्यांचेही आभार मानले आहेत.