आळस अन् थकवा घालवण्यासाठी ५ सोपी आसने

Edited by: ब्‍युरो
Published on: June 21, 2025 11:31 AM
views 222  views

2015 पासून दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. नियमित योगासने करणे हे भारतीय आरोग्य संस्कृतीचा एक भाग आहे. यामध्ये सूर्यनमस्कारालाही महत्व आहेच. सध्याच्या धाकाधकीच्या आणि गतीमान स्पर्धेच्या जगात योग ही खूपच आवश्यक गोष्ट बनली आहे.

योग फक्त शारिरिकच नाही तर मानसिक सक्षमता देण्यासाठी तसेच मेंटल हेल्थसाठी फायदेशीर ठरते. अलिकडे रोजगाराचा प्रश्न एकाकी जीवनपद्धतीत येणारा ताणतणाव आणि बदलत्या जीवनशैलीमुळे, तासनतास बसून काम केल्याने लोकांना मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवतो. ताण तणावाचे व्यवस्थापन न झाल्यास मग डिप्रेशनला सुरूवात होते. त्यामुळे अशी स्थितीच उद्धवू नये म्हणून आपण जास्त तंदुरुस्त राहणे क्रमप्राप्त ठरते.

जे ताण घेतात आणि तणावपुर्ण वातावरणात राहतात वेळ घालवतात अशी लोक लवकर थकतात तसेच त्यांच्यात आळस वाढत जातो असे म्हटले जाते, त्यामुळे ही परिस्थिती काही खास योगासनं कल्याने दुर होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला अशा 5 सोप्या योगासनांबद्दल सांगणार आहोत, जे केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण दिवस ताजेतवाने आणि ताजेतवाने वाटेल.

1. ताडासन- हे योगासन शरीरात रक्ताभिसरण सुधारते आणि संपूर्ण शरीर ताणते. हे मणक्याचे बळकटीकरण करते आणि शरीरात ऊर्जा प्रसारित करते. खासकरुन शरीराला सक्रीय ठेवण्यात या योगासनाची मोठी मदत मिळते.

2. भुजंगासन- भुजंगासन हे योगासन केल्याने आळस दूर राहतो. या आसनाला कोब्रा पोज असेही म्हणतात. ते पाठीचे स्नायू मजबूत करते, थकवा दूर करते आणि शरीरात ऊर्जा आणते.

3. अधोमुख श्‍वानासन- अधोमुख स्वनासन देखील आळस दूर करण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा देण्यासाठी खूप चांगले आहे. हे योगासन संपूर्ण शरीर सक्रिय करते. ते विशेषतः पाय आणि हातांची ताकद वाढवते आणि आळस दूर करते.

4. अनुलोम-विलोम- प्राणायाम सर्वात सोपा आणि प्रभावी अनुलोम-विलोम प्राणायाम जो लहान मुले तसेच वृद्धांनाही सहज करता येतो. ही श्वास घेण्याची पद्धत मनाला शांत करते, मानसिक थकवा दूर करते आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत करते.

5. शवासन- आळसापासून मुक्त ठेवते, ते म्हणजे शवासन. हे योगासनाच्या शेवटी केले जाणारे एक आसन आहे जे शरीर आणि मनाला पूर्ण विश्रांती देते. ते तणाव आणि थकवा त्वरित दूर करते.