काळजी घ्या ! कणकवली तालुक्यात डेंग्यूचे 5 सदृश्य रुग्ण

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 11, 2023 11:32 AM
views 593  views

कणकवली : कणकवली तालुक्यात 5 डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळले आहेत. शहरांमध्ये कनक नगर व जळकेवाडी येथे 11व 15 वर्षाची दोन मुले डेंग्यू ची लक्षण असलेली आढळली. अन्य गावांमध्ये 3 अशी एकूण कणकवली तालुक्यात 5 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.

आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कणकवली शहरात डास मारण्यासाठी औषध फवारणी केली जाते. पण यंदा नगरपंचायत प्रशासनाकडून डास निर्मूलन औषध फवारणी करताना दिसत नाही. नगरपंचायत प्रशासक नेमलेला आहे.आणि प्रशासनाने सतर्कतेने काम करण्याची गरज आहे. 

कणकवली शहरात कनकनगर आणि जळकेवाडी येथे दोन अठरा वर्षाखालील डेंग्यू सदृश्य मुले आढळली असल्याने सार्वजनिक ठिकाणी शाळा, कॉलेज त्यांच्या आवारात डेंग्यूची अळी होऊ नये यासाठी कीटकनाशकांचा वापर आरोग्य कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे नगरपंचायतने प्रशासनाने देखील पुढाकार घेऊन डास मारण्यासाठी धूर फवारणी करून डास निर्मूलन करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.