सावंतवाडी : जिल्ह्यातील कला व सांस्कृतिक चळवळीमध्ये नेहमीच अग्रेसर असलेले श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ आयोजित दीपकभाई केसरकर मित्रमंडळ व सावंतवाडी नगरपरिषद प्रस्तुत सलग पाचव्या वर्षी श्री निलेश मेस्त्री निर्मिती व संकल्पनेतून खास त्रिपुरारी पौर्णिमेनिम्मित आयोजित करण्यात आलेल्या "हे चांदणे फुलांनी.. जुन्या-नव्या हिंदी व मराठी गीतांचा सदाबहार नजराणा व नृत्याविष्कार" या मैफिलीने उपस्थित रसिकांची मने जिंकली.
सोमवारी दिनांक ७ नोव्हेंबर रोजी जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथे ही मैफील रंगली, सद्गुरु संगीत विद्यालयाच्या वर्षा देवण, अँड. सिद्धी परब, समृद्धी सावंत, मधुरा खानोलकर, केतकी सावंत, गौरांगी सावंत, अनामिका मेस्त्री, पूजा दळवी, नितिन धामापूरकर, भास्कर मेस्त्री, सर्वेश राऊळ, मानसी वझे,अंकुश आजगांवकर, स्मिता गावडे, प्रगती मिशाळ, चिन्मयी मेस्त्री, श्रीया म्हालटकर, तन्वी दळवी, वैष्णवी गावडे, लतिका नाईक, वैष्णवी वाडकर आदी कलाकारांच्या एकापेक्षा एक सरस गीतांनी सावंतवाडीकर मंत्रमुग्ध झाले. तर वैष्णवी गावडे व कलानिकेतन सांस्कृतिक कला मंडळ,शाखा सावंतवाडी व बांदा च्या जिया कळंगूटकर, वैदेही बांदेकर, निधी सावंत, दुर्वा गवस, वेदीका गावडे, मनस्वी हरमलकर, सिद्धाली राऊळ, प्राजक्ता कळंगूटकर, शेफाली केसरकर यांच्या नृत्यामुळे कार्यक्रमाला अधिकच रंगत आली.
या कार्यक्रमाला साथसंगत निलेश मेस्त्री , कु. मंगेश मेस्त्री (हार्मोनियम) , किशोर सावंत व कु निरज मिलिंद भोसले (तबला), कु शुभम सुतार (ढोलक/ढोलकी) , अश्विन (गुड्डू) जाधव (ऑक्टोपॅड), बाळकृष्ण मेस्त (सिंथेसायझर) यांची लाभली. ध्वनीव्यवस्था सुभाष शिरोडकर यांनी सांभाळली व संजय कात्रे, सौ.उमा तिळवे यांचे सूत्रसंचालन कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बबनराव साळगांवकर, सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील राऊळ, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, नादब्रह्म सावंतवाडीचे अध्यक्ष प्रदीप शेवडे आबा केसरकर, नंदू शिरोडकर, भारती मोरे, पुंडलिक दळवी, सुधीर आडिवरेकर, अभिमन्यू लोंढे, भाऊ साळगावकर, भाई देऊलकर, दादा मडकईकर, वैभव केंकरे,विनोद गांवकर,संदीप गवस, दिनकर परब, हेमंत खानोलकर, सोमा सावंत,तानाजी सावंत व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तर सुधीर आडीवरेकर, महादेव गावडे, राघव नाईक, अर्चना नाईक, गजानन वेंगुर्लेकर, राजन हावळ, गोविंद मळगावकर, समर्थ केळुसकर, अखिलेश कानसे यांचे विशेष सहकार्य लाभले.