दुर्गाडी डोंगरावर रंगणार “बाळूमामा स्पोर्ट्स चषक २०२६”चा थरार

आचिर्णे येथे निसर्गाच्या कुशीत भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 26, 2026 11:31 AM
views 54  views

वैभववाडी : आचिर्णे धनगरवाडा येथील दुर्गाडी डोंगरावर निसर्गाच्या सान्निध्यात “बाळूमामा स्पोर्ट्स चषक २०२६” या भव्य खुल्या अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जय मल्हार दुर्गोबा मंडळ, आचिर्णे (दार्ये धनगरवाडा) व जय मल्हार मित्र मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.१मार्चला ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. डोंगर-दऱ्या आणि कड्याकपाऱ्यांच्या साक्षीने धनगर समाज बांधवांनी आयोजित केलेली ही स्पर्धा यंदा विशेष आकर्षण ठरणार आहे. स्पर्धेला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक दिलीप रावराणे यांची प्रमुख उपस्थिती असणारं आहे.तसेच जिल्हा परिषद सदस्या रिद्धी सुतार,प.स.सदस्य सिद्धेश रावराणे उपस्थित राहणार आहेत.या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक ९,९९९/-व चषक द्वितीय पारितोषिक ५,५५५ व चषक असं असणारं आहे.तसेच  उत्कृष्ट गोलंदाज, शिस्तबद्ध संघ,सामानावीर,मालीकावीर,यांनाही बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.त्याचबरोबर सहभागी प्रत्येक संघाला सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत संघांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून क्रिकेट सामन्यांचा आनंद घ्यावा, असे आवाहन स्थानिक मंडळाचे अध्यक्ष संतोष बोडके व मुंबई मंडळाचे अध्यक्ष सचिन हुंबे यांनी केले आहे.स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी समीर हुंबे ९९२२५७१७११,आनंद झोरे ८७६६९२७२१९,शरद बोडके ९३२२६९६३८९,मंगेश बोडेकर ९७०२०२८६५८ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.