माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात | प्रकृती स्थिर

Edited by:
Published on: June 27, 2024 06:22 AM
views 766  views

नवी दिल्ली : भाजपचे नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी रात्री उशिरा त्यांना 'एम्स'मध्ये अॅडमिट करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर देखरेख केली जात असल्याचं सूत्रांकडून समजत. 

९६ वर्षीय लालकृष्ण अडवाणी यांना (एम्स) येथील खाजगी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.