
कणकवली : तांबे एज्युकेशन सोसायटी संचलित करंजे नागवे साकेडी पंचक्रोशी आदर्श विद्यालयामध्ये तालुका विधी सेवा समिती कणकवली मार्फत कायदेविषयक शिबिर आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी.एस. परब सर तर प्रमुख पाहुणे म्हणून दिवाणी न्यायाधीश एस .जी .लुटुरिया होते. यावेळी लुटूरिया यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नानचे, ऍड. मिलिंद सावंत, ऍड. पद्मज बेलवलकर यांनी राईट टू एज्युकेशन , सायबर क्राईम, बालकांवरील लैंगिक अत्याचाराचा गुन्हा आदी विषयावर मार्गदर्शन केले.
आजच्या जगामध्ये मोठ्या प्रमाणावर सायबर क्राईम होत आहेत. सायबर क्राईम कशा पद्धतीने रोखता येईल, सोशल मीडिया तसेच मोबाईलचा वापर सुरक्षित पद्धतीने कसा करता येईल, याबद्दल माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तर या सत्रामध्ये देण्यात आली.
कार्यक्रमाला पोलीस श्री. कुंभार, श्री हालके श्री. लोणारी , वरिष्ठ लिपिक सौ. आचार्य, श्री. मोपेरकर, सर्व विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.











