दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील गेली कित्येक वर्ष प्रतीक्षा असलेल्या 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी मंजूर झालेल्या मुख्य इमारतीचा बांधकाम भूमिपूजन सोहळा मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, वैभव नाईक, नितेश राणे, यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी सकाळी १० वाजता हा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे.
या सोहळ्यास सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अप्पर सचिव दीपक म्हैसकर, मनीषा पाटणकर - म्हैसकर, सचिव एन. नवीन सोना, इमारती सचिव एस. डी दशपुते, आयुक्त धीरज कुमार, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, बांधकाम कोकण विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज, कार्यकारी संचालक स्वप्निल लाळे, संचालक नितीन अंबाडेकर, उपसंचालक प्रेमचंद कांबळे, बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक बाळासाहेब नागरगोजे व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर एवाळे यांची उपस्थिती राहणार आहे.