
वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असलेले व सध्या मुंबईत बोरीवली तहसील कार्यालयात सेवा बजावत असलेल्या सतीश शांताराम कडू यांनी भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील बी एल ओ व पर्यवेक्षक याच प्रशिक्षण पुर्ण केले. याबद्दल राज्याचे सहाय्यक निवडणूक कार्यकारी अधिकारी किरण शार्दुल यांनी प्रमाणपत्र देऊन गौरविले.
भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, झारखंड ,लडाख या राज्यातील प्रमुख अधिका-यांच दिल्ली येथे ३ व ४जुलैला प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थित सर्व अधिका-यांना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपजिल्हाधिकारी संदीपकुमार अपार, उपजिल्हाधिकारी नितीन हिंगोले, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे यांनी या प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
श्री.कडू यांची या प्रशिक्षणासाठी बोरीवली (१५२) विधानसभा पर्यवेक्षक म्हणून निवड झाली होती. दोन दिवसांच प्रशिक्षण श्री कडू यांनी यशस्वीपणे पूर्ण केले. त्याबद्दल सहाय्यक निवडणूक कार्यकारी आयुक्त किरण शार्दुल यांच्या हस्ते श्री कडू यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.