
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे व  जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय कला उत्सवामध्ये 'खेळणी तयार करणे'  या गटामध्ये सावंतवाडी शहरातील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा इयत्ता अकरावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी साईश संदीप कांबळी याने राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याची  भुवनेश्वर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी स्तुत्य निवड झाली आहे. सदर स्पर्धा दिनांक २ व ३ जानेवारी २०२३ रोजी होणार आहेत. साईश याच्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष  राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोसले, चेअरमन राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोसले, विश्वस्त युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी अभिनंदन केले व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. साईश  कांबळी याला कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. व्ही. पी. राठोड, व मार्गदर्शक प्रा. अमोल कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
 
 
    
                    
   


 
 
      
   
   
  
 
  
  
  
  
  	
   
   



 
 
               







 
       
       
       
       
      