सावंतवाडी : जागतिक एड्स दिनानिमित्त सावंतवाडीतील पंचम खेमराज लाॅ कॉलेजच्यावतीने एड्स जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आलं. पंचम खेमराज लाॅ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सावंतवाडी बस स्थानक आणि गांधी चौक परिसरात हे पथनाट्य सादर केलं.
या पथनाट्यातून एड्सविषयक जनजागृती करण्यात आली. यावेळी कॉलेजच्या प्राचार्या अश्विनी लेले, प्रा. पूजा जाधव, प्रा. श्रीषा कुलकर्णी, प्रा.अश्विनी वेंगुर्लेकर, प्रा. भाग्यश्री शिर्के, प्रा. अभिरुची राऊळ, प्रा. सोनाली कुडतरकर आदि उपस्थित होते.