दोडामार्ग : कसई दोडामार्ग नगरपंचायतचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या माध्यमातून आज नगरपंचायत कर्मचारी यांना रेनकोट वाटप करण्यात आले.
चेतन चव्हाण मित्रमंडळ व स्वतः चेतन चव्हाण समाजात राजकारणा बरोबर समाज कार्य ही करत आहेत. त्यांनी समाजातील अनेक नागरिकांना मदतीचा हातही केला आहे. आरोग्याच्या बाबतीत तर त्यांनी तालुक्यात अनेक रक्तदान शिबिररही घेतली आहे अशा प्रकारे समाज कार्य करत असताना त्यांनी आज येथील नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांना साफसफाई किंवा बाजारातील इतर कामे करताना पावसाळ्यात भिजता नये या हेतूने त्यांनी आज रेनकोट वाटप करत समाज कार्य दाखवले आहे. यावेळी त्यांच्या सोबत उपन्गराध्यक्ष देविदास गवस, बांधकाम सभापती नितीन मणेरीकर, समीर रेडकर, व मुखाधिकारी सागर सांळुंखे नगरपंचायत कर्मचारी उपस्तित होते.