
सावंतवाडी : भाजपकडून उपनगराध्यक्षपदासाठी ॲड. अनिल निरवडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुख्याधिकाऱ्यांकडे त्यांनी आपला अर्ज सुपुर्द केला आहे. भाजपच्या नगरसेवकांना व्हीप बजावण्यात आला आहे.
ॲड. निरवडेकर यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला असून भाजपच संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष भाजपचाच बसण्याची शक्यता आहे. यावेळी नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी यांसह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.










