
दोडामार्ग : दोडामार्ग बाजारपेठेतील नंदकुमार मधुकर कुबडे यांचे (मंगळवार दि. १३) नुकतेच निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. दोडामार्ग शहरात ते " नंदू " या नावाने तसेच विनोदी व मिश्किल स्वभावामुळे विशेष परिचित होते. बाजारपेठेतील प्रसिद्ध चायना टाऊन या चायनीज सेंटरचे मालक मधुकर उर्फ काका कुबडे यांचे ते वडील होत.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे, विवाहित मुली, जावई असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात दोडामार्ग मधील अनेकांनी कुबडे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.










