
सावंतवाडी : शिवसेनेकडून देखील नगरसेवक अजय गोंदावळे यांनी उपनगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. मुख्याधिकाऱ्यांकडे त्यांनी अर्ज सुपुर्द केला आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक उपस्थित होते. उपनगराध्यक्ष पदासाठी आपण अर्ज दाखल केला आहे. थोड्याच वेळात हात उंचावून निवड प्रक्रिया पार पडेल. त्यावेळी चित्र स्पष्ट होईल असं विधान नगरसेवक संजू परब यांनी व्यक्त केले.










