देवगड : देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांनी आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केलाय. आ. नितेश राणे यांनी त्यांचे आपल्या पक्ष्यामध्ये स्वागत केले आहे. यावेळी त्या सोबत विजय कदम, आनंद देवगडकर राजेश सावंत आदी उपस्थित होते.
मिताली सावंत ह्या या पूर्वीच भाजप मध्ये प्रवेश झाला होता. त्यांनी या अगोदर देवगड जामसंडे नगरपंचायतीमध्ये भाजपाला पाठिंबा दिला होता. परंतु त्यावेळी त्या राष्ट्रवादीतच होत्या. मात्र आज त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला यावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यांनी आज राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश केल्याचे निश्चित केले आहे.
गेले दोन अडीच वर्षात शिवसेनेची सत्ता असून देवगड जामसंडे नगरवासियांना विकास पाहता आला नाही. याशिवाय कचरा, आरोग्य, स्ट्रीट लाईट, रस्ते व अन्य विकास कामे यांचे अनेक प्रश्न निर्माण झाले. देवगड जामसंडे नगरपंचायतीचा विकास व्हायचा असेल तर आमदार नितेश राणे हाच शेवटचा पर्याय आहे.यामुळे आमदार नितेश राणे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून उपनगराध्यक्ष्या मिताली सावंत यांनी आं.नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.