कुडाळ: कुडाळ नेरूर येथील आदर्शनगर येथे बाबाजी नेरुरकर कुटुंबियांच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उद्योजक संजीव नेरूरकर, सौ. सिम्मी नेरुरकर, समर्थ नेरुरकर, हनुमंत नेरुरकर, बाबाजी नेरुरकर, संजय चव्हाण, बाबल चव्हाण आणी अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी संजीव नेरुरकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.