पारकरांसोबत राजन तेली..!

कणकवलीची राजकीय समीकरणे बदलणार..?
Edited by:
Published on: November 17, 2025 12:18 PM
views 905  views

कणकवली :  कणकवली शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांच्यासह १७ ही प्रभागांमधील शहर विकास आघाडीच्या उमेदवारांनी आज कणकवलीचे ग्रामदैवत स्वयंभूचे दर्शन घेत आपल्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या  प्रक्रियेचा व प्रचाराचा शुभारंभ केला.

यावेळी कणकवली शहर विकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे साकडे ग्रामदैवत स्वयंभूला घालण्यात आले. 

याप्रसंगी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, समृद्धी पारकर, दिवाकर मुरकर, शेखर राणे, साक्षी आमडोस्कर, हर्षद गावडे, तेजस राणे यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.