
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. निता सावंत-कविटकर यांनी आज मुरलीधर मंदिर, हनुमान मंदिर येथे श्रीफळ वाढवून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.
यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. कविटकर यांच्यासह प्रभाग क्रमांक ८ चे उमेदवार अनारोजीन लोबो आणि सुरेंद्र बांदेकर यांनीही श्रीफळ वाढवून प्रचाराचा धडाक्यात प्रारंभ केला. या महत्त्वपूर्ण शुभारंभ कार्यक्रमाला शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर शिवसेनेचे नगरसेवक उमेदवार तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.










